• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 17, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

by pravin
July 17, 2026
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, बातम्या, बॉक्सिंग
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी महत्त्वपूर्ण नियुक्ती भारतीय बॉक्सिंग संघटनेने (Boxing Federation of India) जाहीर केली आहे. ग्लासगो (स्कॉटलंड) येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ साठी डॉ. राकेश तिवारी यांची निरीक्षक (Observer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय बॉक्सिंगमधील त्यांच्या दीर्घ अनुभवाची आणि प्रशासकीय कार्यक्षमतेची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

डॉ. राकेश तिवारी हे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन (U/s 8) चे सचिव असून राज्यातील बॉक्सिंगच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटनात्मक स्तरावर त्यांनी केलेल्या योगदानामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे.

या नियुक्तीबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने डॉ. तिवारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित देशमुख, सचिव रोहन टाक, उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर चव्हाण तसेच सदस्य राहुल टाक उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. तिवारी यांची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी झालेली नियुक्ती ही महाराष्ट्रातील बॉक्सिंग क्षेत्रासाठी गौरवास्पद असून राज्यातील युवा बॉक्सर आणि प्रशिक्षकांसाठी ती प्रेरणादायी आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा भारतीय बॉक्सिंगला निश्चितच मोठा लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Tags: Boxing Federation of IndiaBoxing NewsChhatrapati SambhajinagarCommonwealth BoxingCommonwealth Games 2026Dr Rakesh TiwariIndian BoxingMaharashtra Boxing AssociationMaharashtra SportsSports Panorama
ShareTweetSend

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.