• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

गेल्या नऊ वर्षांत क्रीडाविषयक खर्चात तिप्पट वाढ!- पंतप्रधान नरेंद्र मोदी

by pravin
April 7, 2025
in नॅशनल गेम्स, बातम्या
Reading Time: 1 min read
गेल्या नऊ वर्षांत क्रीडाविषयक खर्चात तिप्पट वाढ! पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऋतुजा, आकाश ध्वजवाहक; स्मिता शिरोळे पथकप्रमुख

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पणजी :- गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने क्रीडाविषयक खर्चात तिप्पट वाढ केली आहे. याचप्रमाणे २०३६ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे यजमान भूषवण्यासाठी देश उत्सुक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गोव्यात ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात केले.


“राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून देशभरातली क्रीडापटू एकत्रित येतात. या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडते,” असे मोदी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. जवाहरलाल् नेहरू स्टेडियमवर झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात गोव्याचे सांस्कृतिक प्रतिबिंब उमटवणारे कार्यक्रम सादर करण्यात आले.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती टेनिसपटू ऋतुजा भोसले आणि कबड्डीपटू आकाश शिंदे यांनी सोहळ्यात महाराष्ट्राच्या ध्वजवाहकाची भूमिका पार पाडली. तर ध्यानचंद पुरस्कार विजेत्या स्मिता शिरोळे पथकप्रमुख आहेत. मनोज भोरे, धनंजय भोसले उपपथकप्रमुख आहेत. याचप्रमाणे तेजस शिंदे, अजिंक्य दुधारे, निलेश जगताप, उदय पवार हे पथक अधिकारी आहेत.

Tags: 37th National Games GoaLatest sports newslatest sports news marathiMarathi sports news
ShareTweetSend
Next Post
३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जिम्नॅस्टिक्समहाराष्ट्राचे ‘सुवर्णपंचक’

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जिम्नॅस्टिक्समहाराष्ट्राचे ‘सुवर्णपंचक’

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.