• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 27, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

ऐतिहासिक पाऊल : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्रोत्साहनात्मक अनुदानाचे वितरण

उपसंचालकांच्या हस्ते अनुदान वितरण

by pravin
June 27, 2026
in अन्य खेळ, जिल्हा, पुरस्कार, योजना
Reading Time: 2 mins read
ऐतिहासिक पाऊल : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्रोत्साहनात्मक अनुदानाचे वितरण
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर |  प्रतिनिधी

शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा आणि शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने सन 2025-26 शैक्षणिक वर्षातील प्रोत्साहनात्मक अनुदान वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

आयोजित कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजीनगर विभाग शेखर पाटील यांच्या हस्ते विजेत्या संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदानाचे धनादेश प्रदान करण्यात आले. या प्रसंगी  बाजीराव देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, तालुक्याचे तालुका क्रीडा संयोजक  एकनाथ ढोके, फुलंब्री,  निलेश माने व शफी शेख, गंगापूर, निलेश गायके, वैजापूर, सोमनाथ टाक,  सकपाळ, पैठण, कृष्णा धनावट, सिल्लोड,  अशिष कान्हेड, खुलताबाद, गणेश बेटूदे, छत्रपती संभाजीनगर, क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच शासनाच्या निर्णयानुसार जिल्हास्तरीय व महानगरपालिका क्षेत्रातील 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या शालेय क्रीडा स्पर्धांतील कामगिरीचे गुणांकन करून प्रत्येक वयोगटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करण्यात आली. विजेत्या संस्थांना रोख प्रोत्साहनपर अनुदान प्रदान करण्यात आले.वयोगट निहाय तीन शाळांची निवड करून प्रोत्साहनात्मक अनुदान वितरीत खालीलप्रमाणे केलेले आहे.

14 वर्षे गट 

  • प्रथम: केंब्रिज स्कूल, छत्रपती संभाजीनगर – ₹90,000
  • द्वितीय: वुडरिज हायस्कूल, छत्रपती संभाजीनगर – ₹65,000
  • तृतीय: पद्मश्री शंकरबापू आपेगावकर इंग्लिश स्कूल, सुंदरवाडी – ₹40,000

17 वर्षे गट

  • प्रथम: केंब्रिज स्कूल, छत्रपती संभाजीनगर – ₹89,800
  • द्वितीय: डिफेन्स करिअर अकॅडमी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, शहापूर (ता. गंगापूर) – ₹64,800
  • तृतीय: बळीराम पाटील विद्यालय, छत्रपती संभाजीनगर – ₹39,800

19 वर्षे गट

  • प्रथम: देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर – ₹89,800
  • द्वितीय: छत्रपती शिवाजी प्रिपरेटी ज्युनिअर कॉलेज, छत्रपती संभाजीनगर – ₹64,800
  • तृतीय: राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा, रायपूर – ₹39,800

तालुकास्तरीय उत्कृष्ट शाळांचाही गौरव

याच कार्यक्रमात सन 2025-26 मधील तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये किमान दहा खेळांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील प्रथम तीन शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

अ.क्र.तालुकाप्रथमद्वितीयतृतीय
1सोयगावसंत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगावश्री स. भु. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोंदेगावमाणिकराव पालोदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, फर्दापूर
2फुलंब्रीशांतीनिकेतन विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, फुलंब्रीजि. प. प्रशाला, गणोरीसमता विद्या मंदिर माध्यमिक शाळा, फुलंब्री
3वैजापूरजिल्हा परिषद प्रशाला, लासूरगावस्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गारजदेवगिरी ग्लोबल अकॅडमी, वैजापूर
4पैठणज्ञानेश्वर विद्यालय, एकतुनीमाध्यमिक विद्यालय, नांदरजिल्हा परिषद प्रशाला, आडूळ
5खुलताबादअल इरफान माध्यमिक शाळा, सुलीभंजनसाई पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सावंगी बाजारसद्गुरु जनेश्वर माध्यमिक विद्यालय, घोडगाव
6कन्नडमहात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिशोरश्री गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवगाव (रंगारी)साधना पाटील प्राथमिक विद्यालय, नरसिंगपूर
7सिल्लोडसंत कबीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रेलगावस्वामी विवेकानंद इंग्लिश प्रायमरी स्कूल, शिवणाश्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भराडी
8छत्रपती संभाजीनगरकै. कमलसिंग नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ढवळापुरीआर्य चाणक्य विद्याधाम, जटवाडाछत्रपती संभाजीराजे इंग्लिश प्रायमरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वडगाव कोल्हाटी
9गंगापूरराष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा, रायपूरभोंडवे पाटील पब्लिक स्कूल, बजाजनगर-वडगावछत्रपती शिवाजी प्रिपरेटरी ज्युनिअर कॉलेज, शहापूर बंजर

सोयगाव, फुलंब्री, वैजापूर, पैठण, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर तालुक्यांतील उत्कृष्ट शाळांचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका क्रीडा अधिकारी मुकूंद वाडकर, क्रीडा अधिकारी रेखा परदेशी, रामकिशन मायंदे, खंडू यादवराव तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

Tags: #SportsPanorama #SchoolSports #SportsNews #ChhatrapatiSambhajinagar #DistrictSportsOffice #MaharashtraSports #SchoolGames #SportsAwards #Education #YouthSports #KhelIndia #MarathiNews
ShareTweetSend

ताज्या बातम्या

ऐतिहासिक पाऊल : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्रोत्साहनात्मक अनुदानाचे वितरण

ऐतिहासिक पाऊल : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्रोत्साहनात्मक अनुदानाचे वितरण

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्रशाला बहिरगाव शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्रशाला बहिरगाव शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

दाम्बुल्लामध्ये रंगला वाद! वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंका ‘अ’ खेळाडूमध्ये शाब्दिक चकमक

दाम्बुल्लामध्ये रंगला वाद! वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंका ‘अ’ खेळाडूमध्ये शाब्दिक चकमक

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.