• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 4, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री चषक ४१ वी राज्यस्तरीय युवा गट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा ४ ते ९ जुलै दरम्यान

by pravin
July 4, 2026
in बास्केटबॉल, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री चषक ४१ वी राज्यस्तरीय युवा गट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा ४ ते ९ जुलै दरम्यान
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

स्पोर्ट्स पॅनोरमा | छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन यांच्या वतीने, छत्रपती संभाजीनगर जिल्हा व तालुका बास्केटबॉल असोसिएशन, एम.एस.एम. बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सहकार्याने नागपुर नंतर प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुख्यमंत्री चषक ४१ वी राज्यस्तरीय युवागट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा (मुले व मुली) दिनांक ४ ते ९ जुलै २०२६ या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत राज्यातील ३६ मुलांचे जिल्हा संघ व ३१ मुलींचे जिल्हा संघ सहभागी होत असून, एकूण ८०४ खेळाडू आणि २४० अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील युवा बास्केटबॉलपटूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.

या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आगामी राष्ट्रीय युवा बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलांच्या व मुलींच्या संघांची निवड याच स्पर्धेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे युवा गटांचे बास्केटबॉल संघ जाहीर, कर्णधारपदी साहिल उंदिरवाडे, उप-कर्णधार जय गुप्ता, कर्णधार कनिष्क गायकवाड, उप-कर्णधार आकृती बाहेती
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे युवा गटांचे बास्केटबॉल संघ जाहीर, कर्णधारपदी साहिल उंदिरवाडे, उप-कर्णधार जय गुप्ता, कर्णधार कनिष्क गायकवाड, उप-कर्णधार आकृती बाहेती

स्पर्धेतील सामने एक इनडोअर आणि तीन आऊटडोअर कोर्टवर खेळविण्यात येणार आहेत. सहभागी सर्व खेळाडूंची निवास व्यवस्था एम.आय.टी. वसतिगृहात तर भोजन व्यवस्था एम.आय.टी. मेसमध्ये करण्यात आली आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष मा.आ संदीपजी जोशी, सचिव गोविंद कृष्णन मुथुकुमार, संयुक्त सचिव  ललित नाहटा व  जयंत देशमुख यांचे नेतृत्व लाभले आहे. स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून  किशोर शितोळे व आमदार  अनुराधाताई चव्हाण, स्वागत समितीचे अध्यक्ष तथा महापौर समीर राजूरकर (महापौर), उपाध्यक्ष तथा स्थायी समिती सभापती अनिल मकारिये, नगरसेवक  सुनील जगताप आणि प्रा. डॉ. संदीप जगताप कार्यरत असून, आयोजन सचिव  अनूप राजूरकर,

तसेच संयुक्त आयोजन सहसचिव  गणेश कड व  मंजीतसिंग दारोगा हे स्पर्धेचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्थानिक आयोजनचे सचिन तत्तापुरे, महानगर पालिकेचे क्रीडा विभागाचे संजीव बालय्या, सुरेश मिरकर, प्रशांत बुरांडे, सचिन परदेशी, किरण परदेशी, डॉ. विलास तांगडे, समाधान बेलेवार, पुजा दुतोंडे, विपुल कड, अनिस साहुजी, आकाश टाके, सौरभ दिपके आदी प्रयत्न करीत आहेत. तसेच या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष  किशोर शितोळे यांनी दिली.

Tags: Basketball Championship 2026Basketball MaharashtraBasketball News MarathiChhatrapati Sambhajinagar BasketballChief Minister Cup BasketballDivision Sports Complex GarkhedaMaharashtra Sports NewsMaharashtra State Basketball ChampionshipNational Team SelectionSports PanoramaYouth Basketball Championship 2026Youth Basketball Indiaछत्रपती संभाजीनगर क्रीडामहाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनमुख्यमंत्री चषक बास्केटबॉल स्पर्धाराज्यस्तरीय युवा बास्केटबॉल स्पर्धा
ShareTweetSend

ताज्या बातम्या

प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री चषक ४१ वी राज्यस्तरीय युवा गट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा ४ ते ९ जुलै दरम्यान

प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री चषक ४१ वी राज्यस्तरीय युवा गट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा ४ ते ९ जुलै दरम्यान

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2026 : छत्रपती संभाजीनगरात 13 जुलैपासून जिल्हा व महापालिका स्तरावरील सामने

छत्रपती संभाजीनगरात सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचा बिगुल; १३ जुलैपासून जिल्हा व महापालिका स्तरावरील सामने

FIBA आशिया कप 2025 : कतारचे पुनरागमन, तरीही भारताची 44-42 अशी निसटती आघाडी कायम

FIBA आशिया कप 2025 : कतारचे पुनरागमन, तरीही भारताची 44-42 अशी निसटती आघाडी कायम

FIBA आशिया कप 2025 : प्रणव प्रिन्स-हर्ष डागरची चमक; भारताची हाफटाइमला कतारवर 30-22 आघाडी

FIBA आशिया कप 2025 : प्रणव प्रिन्स-हर्ष डागरची चमक; भारताची हाफटाइमला कतारवर 30-22 आघाडी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.