• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 30, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय सब ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत आराध्य हिवराळेची कांस्यपदकाची कामगिरी

by pravin
June 29, 2026
in बॉक्सिंग, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय सब ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत आराध्य हिवराळेची कांस्यपदकाची कामगिरी
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

 पंजाबमधील जालंधर येथे दि. 22 ते 29 जून 2026 या कालावधीत आयोजित यू-15 सब ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडू आराध्य हिवराळे याने दमदार खेळाचे प्रदर्शन करत 43 ते 46 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

स्पर्धेतील प्रत्येक लढतीत आत्मविश्वास, वेगवान पंच आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याच्या जोरावर आराध्यने प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदकाची कामगिरी करत त्याने आपल्या गुणवत्तेची प्रभावी छाप पाडली.

आराध्यच्या या यशामागे प्रशिक्षक सुरज बचके यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत लाभली. त्यांच्या प्रशिक्षणामुळेच आराध्यला राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करता आली.

या यशाबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत देशमुख, उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर चव्हाण, सचिव रोहन टाक तसेच सदस्य राहुल टाक यांनी आराध्य हिवराळेचे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्यातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ही कामगिरी असून आगामी काळात आराध्य आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि देशाचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास क्रीडा क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

Tags: Abhijit DeshmukhAradhya HiwaraleBoxing Federation of IndiaBoxing indiaBoxing News MarathiBronze MedalChandrashekhar ChavanChhatrapati Sambhajinagar BoxingJalandhar BoxingMaharashtra BoxingNational Boxing Championship 2026National MedalPunjab Boxing ChampionshipRohan Taksports news marathiSports PanoramaSub Junior BoxingSuraj BachkeU-15 Boxing ChampionshipYoung Boxerआराध्य हिवराळेकांस्यपदकक्रीडा बातम्यामहाराष्ट्र बॉक्सिंगराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा
ShareTweetSend
Next Post
फुटबॉलच्या महान खेळाडूची प्रेरणादायी संघर्षगाथा

11व्या वर्षी गंभीर आजाराशी झुंज, आर्थिक संकटावर मात; जिद्दीच्या जोरावर लिओनेल मेस्सी बनला फुटबॉलचा बादशाह!

ताज्या बातम्या

FIBA बास्केटबॉल विश्वचषक 2027 आशियाई सामन्याचा निकाल लेबनॉनचा भारतावर दणदणीत विजय

FIBA बास्केटबॉल विश्वचषक 2027 आशियाई सामन्याचा निकाल : लेबनॉनचा भारतावर दणदणीत विजय

तिसऱ्या क्वार्टरअखेर: लेबनॉनची आघाडी कायम; भारत 35 गुणांनी पिछाडीवर

तिसऱ्या क्वार्टरअखेर: लेबनॉनची आघाडी कायम; भारत 35 गुणांनी पिछाडीवर

हाफटाइम अपडेट | लेबनॉन विरुद्ध भारत | FIBA बास्केटबॉल विश्वचषक 2027 आशियाई पात्रता फेरी

हाफटाइम अपडेट | लेबनॉन विरुद्ध भारत | FIBA बास्केटबॉल विश्वचषक 2027 आशियाई पात्रता फेरी

FIBA बास्केटबॉल विश्वचषक 2027 आशियाई पात्रता फेरी : पहिल्या क्वार्टरअखेर भारत 14 गुणांनी पिछाडीवर

FIBA बास्केटबॉल विश्वचषक 2027 आशियाई पात्रता फेरी : पहिल्या क्वार्टरअखेर भारत 14 गुणांनी पिछाडीवर

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.