• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

देवगिरी महाविद्यालयाच्या प्रा. राकेश खैरनार यांना ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2026’ प्रदान

by pravin
April 18, 2026
in अन्य खेळ, पुरस्कार, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
प्रा. राकेश खैरनार राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2026
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): देवगिरी महाविद्यालयातील कनिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्रा. राकेश अभिमन खैरनार यांना क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या भरीव व उल्लेखनीय कार्यगिरीबद्दल “राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2026” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे नाशिक येथे आयोजित भव्य समारंभात हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

प्रा. खैरनार यांनी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम निर्माण करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन देणे तसेच विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी घडवून आणणे या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे अनेक खेळाडूंनी जिल्हा, विभागीय, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, हा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव तर आहेच, शिवाय इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. हा पुरस्कार मराठी अभिनेत्री व रील स्टार स्वरा राजपुत तसेच गणेश विटेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या अभिमानास्पद यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मा. सतीश चव्हाण, प्राचार्य डॉ. रवी पाटील, उपप्राचार्य प्रा. गणेश मोहिते, उपप्राचार्या डॉ. अर्पणा तावरे, उपप्राचार्य प्रा. अरुण काटे तसेच प्रा. ज्ञानेश्वर हिवरे, प्रा. विजय नलावडे, पर्यवेक्षक प्रा. सीमा पाटील, प्रा. किरण पतंगे, प्रा. रवि पाटील, प्रा. मंगेश मोरे आणि प्रा. राजन राजपुत यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापकांनी प्रा. खैरनार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

प्रा. राकेश अभिमन खैरनार यांच्या या यशामुळे देवगिरी महाविद्यालयासह संपूर्ण मराठवाडा विभागाचा अभिमान उंचावला असून, त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: sports news marathiआनंदी युनिव्हर्स फाउंडेशनक्रीडा क्षेत्रक्रीडा प्रशिक्षकदेवगिरी महाविद्यालयनाशिक कार्यक्रमप्रा. राकेश खैरनारमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळमहाराष्ट्र बातम्याराष्ट्रीय गौरव पुरस्कार 2026
ShareTweetSend
Next Post
एडीसीए अध्यक्षपदी अतुल सावे बिनविरोध; उर्वरित पदांसाठी चुरशीची लढत

एडीसीए अध्यक्षपदी अतुल सावे बिनविरोध; उर्वरित पदांसाठी चुरशीची लढत

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.