• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महाराष्ट्राचे अग्रस्थानावरील वर्चस्व अबाधित

by pravin
November 4, 2023
in बातम्या
Reading Time: 1 min read
तायक्वांदो दोन कांस्यपदके
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पणजी (प्रतिनिधी):महाराष्ट्राने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी नवव्या दिवशी अग्रस्थानावरील वर्चस्व अबाधित राखले. मिनी गोल्फ, ट्रक सायकलिंग, जलतरण आणि अ‍ॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारातील क्रीडापटूंनी या यशात प्रमुख छाप पाडली.

महाराष्ट्राने आतापर्यंत ६३ सुवर्ण, ५६ रौप्य आणि ५९ कांस्यपदकांसह एकूण १७८ पदके जिंकली आहेत. सेनादल दुसऱ्या आणि हरयाणा तिसऱ्या स्थानावर आहे.

महाराष्ट्र मिनी गोल्फ संघाने दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशा एकूण चार पदकाची कमाई केली. ट्रॅक सायकलिंग क्रीडा प्रकारात मयुरी लुटेच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली.

मयुरीने वैयक्तिक सुवर्णपदकासह हॅट्ट्रिक साजरी केली. जलतरणात महाराष्ट्राने तीन रौप्यपदके कमावली. ऋषभ दासने पुरुषांच्या ५० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले आणि रूपेरी हॅट्ट्रिक पूर्ण केली. याचप्रमाणे मिश्र रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळाले.

तायक्वांदो दोन कांस्यपदके

महाराष्ट्राच्या तायक्वांदोपटूंनी शुक्रवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली.
महिलांच्या ५३ किलोखालील गटात निशिता कोतवालने तिसरा क्रमांक मिळवला. दिल्लीच्या अनिशा अस्वालने सुवर्ण आणि रक्षा चहरने रौप्यपदक पटकावले.

महिलांच्या ७३ किलोवरील गटात नम्रता तायडेने तिसरा क्रमांक मिळवला. गोव्याच्या रुडाली बारूआने सुवर्णपदक आणि व्हि प्रवलिका कुस्तागीनेने रौप्यपदक पटकावले.

स्क्वॉश महाराष्ट्र संघाला दुहेरी सुवर्णयशाची संधी

महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला स्क्वॉश संघांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दुहेरी सुवर्णयशाची संधी असेल. दोन्ही संघांची शनिवारी अंतिम फेरीत तमिळनाडूशी सामने होतील.

महाराष्ट्राच्या महिला संघाने उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशवर २-० असा एकतर्फी विजय मिळवला. या संघात उर्वशी जोशी, निरुपमा दुबे आणि अंजली यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सेनादलाचा २-० असा पराभव केला.

स्क्वॉश महाराष्ट्र संघाला दुहेरी सुवर्णयशाची संधी
महाराष्ट्र स्क्वॉश महिला संघाने उत्तर प्रदेश संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला
खेळाडूंचे नाव: उर्वशी जोशी, निरुपमा दुबे आणि अंजली सेमवाल

खो-खो महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची शनिवारी यजमान गोव्याशी सलामी

गोवा येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ४ ते ८ नोव्हेंबर या कलावधीत होणार्‍या खो-खो स्पर्धेसाठीची गटवारी जाहीर केली. महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांची शनिवारी यजमान गोव्याशी सलामी रंगणार आहे.
या स्पर्धेत पुरुषांचे व महिलांचे ८-८ संघ सहभागी होत आहेत. पुरुषांचे व महिलांचे संघ अ व ब गटांत प्रत्येकी चार संघ असे विभागले आहेत. पुरुष विभागात अ-गटात गतविजेत्या महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, प. बंगल व यजमान गोवा यांना तर ब-गटात कर्नाटक, ओडिशा, केरळ व तेलंगणा यांना स्थान देण्यात आले आहे.

महिला विभागात अ-गटात गतविजेत्या महाराष्ट्रासह गुजरात, केरळ, गोवा तर ब-गटात दिल्ली, ओडिशा, कर्नाटक व हरियाणा या संघांना स्थान देण्यात आले आहे. सुरवातीला साखळी पध्दतीने व नंतर बाद पध्दतीने सामने पार पडतील. उपांत्य फेरीचे सामने ७ नोव्हेंबरला सायंकाळी तर अंतिम फेरीचे सामने ८ नोव्हेंबरला सकाळच्या सत्रात पार पडतील.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी डंका वाजवला आहे. यात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ९ वेळा सुवर्ण तर २ वेळा रौप्य पदक मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर महिला संघाने ५ वेळा सुवर्ण, ४ वेळा रौप्य, १ वेळा कांस्य तर एकदा चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.

Tags: 37th National Games Goa37th National Games Goa news37th National Games Taekwondo Maharashtra
ShareTweetSend
Next Post
कबड्डी महाराष्ट्राच्या पुरुष संघाची विजयी सलामी महिला संघ हिमाचल प्रदेशकडून पराभूत

कबड्डी महाराष्ट्राच्या पुरुष संघाची विजयी सलामी महिला संघ हिमाचल प्रदेशकडून पराभूत

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.