• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आनंदिता उपाध्यायचा मानांकित खेळाडूवर खळबळजनक विजय

by pravin
October 27, 2023
in राष्ट्रीयस्तरीय, लॉंग टेनिस
Reading Time: 2 mins read
ईएमएमटीसी - एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आनंदिता उपाध्यायचा मानांकित खेळाडूवर खळबळजनक विजय

आनंदिता उपाध्याय आणि पार्थसारथी मुंढे

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):  ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित आनंदिता उपाध्याय हिने हरियाणाच्या अव्वल मानांकित प्राची मलिकचा 6-2, 7-5 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.
 
छत्रपती संभाजीनगर येथील ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्सवर सुरु असलेल्या एकेरीत मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित तेलंगणाच्या हृतिक कटकमने तामिळनाडूच्या सहाव्या मानांकित फजल अली मीरचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित शिवतेज शिरफुलेने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या आराध्य म्हसदेचा 6-3, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कर्नाटकच्या चौथ्या मानांकित प्रकाश सरन याने गुजरातच्या आठव्या मानांकित ओम पटेलचा 6-2, 6-2 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. दुसऱ्या मानांकित हरियाणाच्या तविश पहवानेकर्नाटकच्या सातव्या मानांकित अनुराग कळंबेलाचा 6-3, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात  तामिळनाडूच्या तिसऱ्या मानांकित सविता भुवनेश्वरनने कर्नाटकच्या कार्तिका पद्मकुमारचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित पार्थसारथी मुंढेने दिया अग्रवालचे आव्हान 7-5, 6-1 असे मोडीत काढले. दुसऱ्या मानांकित ओडिशाच्या आहानने नवव्या मानांकित अविपशा देहुरीचा टायब्रेकमध्ये 6-7(3), 6-2, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव केला.
दुहेरीत मुलांच्या गटात तेलंगणाच्या हृतिक कटकमने हरियाणाच्या तविश पाहवाच्या साथीत ईशान येडलापल्ली व नील केळकर यांचा 6-1, 6-3 असा तर, महाराष्ट्राच्या मनन अग्रवाल व गुजरातच्या ओम पटेल यांनी कुशाग्र अरोरा व नव्या यादव यांचा 6-3, 6-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
हृतिक कटकम(तेलंगणा)(1)वि.वि.फजल अली मीर(तामिळनाडू)(6) 6-1, 6-2;
शिवतेज शिरफुले(महा)(3)वि.वि.आराध्या म्हसदे(महा)(11)6-3, 6-2;
प्रकाश सरन(कर्नाटक)(4) वि.वि.ओम पटेल(गुजरात)(8)6-2, 6-2;
तविश पहवा(हरियाणा)(2)वि.वि.अनुराग कळंबेला(कर्नाटक)(7) 6-3, 6-2;
 
मुली: 
आनंदिता उपाध्याय (महा)(5) वि.वि.प्राची मलिक(हरियाणा)(1)6-2, 7-5;
सविता भुवनेश्वरन(तामिळनाडू)(3)वि.वि.कार्तिका पद्मकुमार(कर्नाटक) 6-2, 6-3;
पार्थसारथी मुंढे (महा(7)वि.वि.दिया अग्रवाल 7-5, 6-1;
आहान(ओडिशा)(2)वि.वि.अविपशा देहुरी(9)6-7(3), 6-2, 6-3;
 

दुहेरी: मुले: उपांत्यपूर्व फेरी:
हृतिक कटकम(तेलंगणा)/तविश पाहवा(हरियाणा)(1)वि.वि.ईशान येडलापल्ली(मध्यप्रदेश)/नील केळकर(महा) 6-1, 6-3;
मनन अग्रवाल(महा)/ओम पटेल(गुजरात)वि.वि.कुशाग्र अरोरा(दिल्ली)/नव्या यादव(दिल्ली) 6-3, 6-0;
दिगंथ एम(कर्नाटक)/अहान शेट्टी(महा)वि.वि.वरद पोळ(महा)/क्रिशांक जोशी(महा) 6-1, 6-3;
फजल अली मीर (तामिळनाडू)/प्रकाश सररान(कर्नाटक)(2)वि.वि.शिवा शर्मा(हरियाणा)/ऋषी यादव(उत्तरप्रदेश) 6-3, 6-2;

 

मुली:
आहान(ओडिशा)/पार्थसारथी मुंढे (महा)(1)वि.वि.नीशा इंजा(तेलंगणा)/श्रेया पठारे(महा) 6-0, 6-2;
सृष्टी किरण(कर्नाटक)/सविता भुवनेश्वरन(तामिळनाडू)वि.वि.सूर्यांशी शेखावत(राजस्थान)/इरा देशपांडे(महा) 7-6(1), 6-2;
दीया अग्रवाल/वृंदिका राजपूत(महा)वि.वि.सानिद्या कारंतोथ(तेलंगणा)/अविपशा देहुरी  7-5, 6-3;
आनंदिता उपाध्याय (महा)/रीत अरोरा(हरियाणा)(2)वि.वि.मधुमिता रमेश(तामिळनाडू)/आहिदा सिंग (कर्नाटक) 6-1, 6-4.

Tags: 7-5Anandita Upadhyay an Parthsarthi MundheEMMTC - MSLTA Under-14 National Tennis Championship Anandita Upadhyay's sensational win over seeded playerTop seed Anandita Upadhyay defeated top seed Prachi Malik of Haryana 6-2
ShareTweetSend
Next Post
मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये दोन रौप्य, दोन कांस्य पदके

मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये दोन रौप्य, दोन कांस्य पदके

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.