• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

अजित सिड्स प्रा.लि. प्रायोजित संभाजीनगर खो-खो प्रीमियर लीगची शानदार सुरवात

by pravin
February 20, 2023
in खो-खो, बातम्या, स्पर्धा
Reading Time: 1 min read
अजित सिड्स प्रा.लि. प्रायोजित संभाजीनगर खो-खो प्रीमियर लीगची शानदार सुरवात
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

संभाजीनगर (प्रतिनिधी): जित सिड्स प्रा.लि. प्रायोजित व संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी अजित सिड्स प्रा.लि. व्यवस्थापकीय संचालक तथा संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष समीर मुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन केले.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस  गोविंद शर्मा, संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, सारिका भंडारी, सहसचिव भारती काकडे,, मोहन अहिरे यांच्या प्रमुख उपस्थिती उद्घाटन झाले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद शर्मा  सूत्र संचलन दिपक सपकाळ यांनी केले. उद्घाटन प्रसंगी दोन सामने खेळवण्यात आले.

पहिला सामना 

समर्थ टायगर्स वि. वि. स्पर्श डिफेण्डर यांच्यात झाला या सामन्यात समर्थ टायगर्स संघाकडून ऋतिका हाके हिने ०१ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले, अस्मित गावित ह्याने ०१:३०मी. संरक्षण केले व आक्रमणात ०४ गडी बाद केले, धनश्री गोर्डे हिने ०१ मी. संरक्षण केले, दक्ष क्षीरसागर ह्याने ०२ गडी बाद केले तर स्पर्श डिफेण्डर संघाकडून अमित हळदीकर याने ०२ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०३ गडी बाद केले, मयूर जाधव याने ०२:३० मी. संरक्षण केले व आक्रमणात ०४ गडी बाद केले, आकांक्षा क्षीरसागर हिने ०१:३० मी. संरक्षण केले, निल जावळे ह्याने आक्रमणात ०२ गडी बाद केले, आदित्य भंगाळे ह्याने ०१ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले समर्थ टायगर 22 गुण तर स्पर्श डिफेडर 21 गुण,या सामन्यात समर्थ टायगर्स हा संघ ०२ मी. राखून व १ गुणाने विजयी झाला.

समर्थ टायगर्स वि. वि. स्पर्श डिफेण्डर

दुसरा सामना 

पद्मावती जायंट्स वि. वि. गोदावरी लॉयन्स यांच्यात झाला पद्मावती जायंट्स संघाकडून आकांक्षा हारकळ हिने ०२ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले, प्राची कर्डिले हिने ०१ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०४ गडी बाद केले, यश मोरे ह्याने ०१ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले, आर्यन सहारे ह्याने ०२ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०१ गडी बाद केला तर गोदावरी लॉयन्स संघाकडून अनिकेत मराठे ह्याने ०१ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले, मोहित कान्हेरे ह्याने ०१ मी. व आक्रमणात ०२ गडी बाद केले, वेदिका गोर्डे हिने ०१ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले, अतुल गावित ह्याने ०१:३० मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले या सामन्यात पद्मावती जायंट्स हा संघ ०२ गुणांनी विजयी झाला.पद्मावती 23 गुण तर गोदावरी लायन्स 21 गुण

स्पर्धेत श्रीपाद लोहकरे, नवनाथ राठोड, योगेश मुंगीकर, मनोज गायकवाड यांनी पंच म्हणून काम बघितले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल नाईकनवरे, चेतन गायकवाड, वरद कचरे, योगेश भोगे, अंकुश गायकवाड,राजपाल निकाळजे यांनी परिश्रम घेतले.

Tags: Ajit Seeds Pvt. Ltd. Great start to sponsored Sambhajinagar Kho-Kho Premier LeagueAjit Seeds Pvt. Ltd. Sambhajinagar Kho-Kho Premier LeagueJoint Secretary Bharti KakadeMaharashtra Kho-Kho Association General Secretary Govind SharmaMohan AhirePresident Sameer MuleSambhajinagar District Kho-Kho Association Vice President Rishikesh JaiswalSarika Bhandari
ShareTweetSend
Next Post
सामर्थ्य प्रिमिअर क्रिकेट लीगचे उद्घाटन; आयुष्य आव्हान स्विकारण्यासाठीच: विश्‍वास नांगरे पाटील

सामर्थ्य प्रिमिअर क्रिकेट लीगचे उद्घाटन; आयुष्य आव्हान स्विकारण्यासाठीच: विश्‍वास नांगरे पाटील

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.