• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

गाेल्डन कामगिरीसाठी कबड्डी संघांचा कसून सराव; दुहेरी मुकुटाचे लक्ष्य गाठण्यासाठी सज्ज

by pravin
September 20, 2022
in कबड्डी, नॅशनल गेम्स
Reading Time: 1 min read
गाेल्डन कामगिरीसाठी कबड्डी संघांचा कसून सराव; दुहेरी मुकुटाचे लक्ष्य गाठण्यासाठी सज्ज
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे (प्रतिनिधी) :  प्रतिष्ठेच्या नॅशनल गेम्समध्ये साेनेरी यशाचा पल्ला गाठण्यासाठी महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला कबड्डी संघ सज्ज झाले आहेत. येत्या २९ सप्टेंबरपासून गुजरातमध्ये नॅशनल गेम्सला सुरुवात हाेणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी महाराष्ट्राचे दाेन्ही संघ पुण्याच्या बालेवाडीमध्ये तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहेत.

यंदाच्या या स्पर्धेत दुहेरी मुकुटाचा बहुमान मिळवून देण्याचे लक्ष्य समाेर ठेऊन दाेन्ही संघांची जय्यत तयारी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा महिला संघ या स्पर्धेत सहभागी हाेणार आहे. यासाठी प्रशिक्षक संजय मुकल यांच्या मार्गदर्शनाखाली टीमची मॅटवर कसून सराव सुरू आहे.

नॅशनल गेम्समध्ये उद्घाटन साेहळ्यापुर्वीच कबड्डीच्या इव्हेंटला सुरुवात हाेणार आहे. या इव्हेंटला २६ सप्टेंबरपासून अहमदाबादच्या मैदानावर सुरुवात हाेणार आहे. नवदुर्गांची जय्यत तयारी; विजयी माळेसाठी संघ उत्सुक नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर लगेच दुसऱ्या दिवसांपासून कबड्डीमध्ये बाजी मारण्यासाठी महाराष्ट्राचा महिला संघ मैदानावर उतरणार आहे.

संघातील नवदुर्गा आता विजयी माळेनेच या उत्सवाला सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहेत. यासाठी काेच संजय आणि कर्णधार स्नेहल यांनी सरावावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे मजबुत असलेला संघ हा स्पर्धेची जबरदस्त तयारी करत आहे.यातून संघाच्या किताबाचा दावा मजबुत मानला जात आहे.

Kabaddi teams train hard for Geldan performance

महाराष्ट्र संघ अधिक मजबुत :

महाराष्ट्राचा मजबुत आणि संतुलीत असा महिला संघ यंदा नॅशनल गेम्समध्ये सहभागी हाेणार आहे. महाराष्ट्राच्या संघामध्ये आता रेल्वेकडून खेळत असलेल्या चार महिला खेळाडूंही सहभागी झाल्या आहेत.यामुळे संघाचा दावा मजबुत झाला आहे. यामध्ये आतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाेत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे.

स्टार साेनालीमुळे बाेनसचा धमाका : महाराष्ट्र महिला संघामध्ये बाेनसची स्टार साेनाली शिंदेचा समावेश आहे.यामुळे टीमला नॅशनल गेम्समध्ये बाेनसचा धमाका उडवण्याची संधी आहे. आपली उंची आणि शैलीदार खेळीत बाेनस मिळवण्यात साेनाली अधिक तरबेज आहे. त्याचा निश्चित असा माेठा फायदा महाराष्ट्र संघाला हाेणार आहे. ‘मी नॅशनल गेम्समध्ये आपल्या महाराष्ट्र संघाला माेठ्या संख्येत बाेनस गुण मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी आम्ही सर्वच जण अधिक कसून सराव करत आहाेत. याचा आम्हाला माेठा फायदा हाेईल. यातून साेनेरी यश सहज संपादन करता येईल, असा विश्वास साेनालीने व्यक्त केेला.

Tags: 36th National Games36th National Sports Tournament News36th National Sports Tournament: Maharashtra hopes for Shri Ganesha in table tennisKabaddi teams train hard for Geldan performance
ShareTweetSend
Next Post
३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा टेबल टेनिस मध्ये महाराष्ट्राच्या महिलांना रौप्य पदक पुरुष गटात महाराष्ट्राला ब्रॉंझपदक

३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा टेबल टेनिस मध्ये महाराष्ट्राच्या महिलांना रौप्य पदक पुरुष गटात महाराष्ट्राला ब्रॉंझपदक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.