• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

ग्रामीण पोलिस, मसीआ, महावितरण संघ बाद फेरीत दाखल

by pravin
March 26, 2022
in क्रिकेट, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp
औरंगाबाद (प्रतिनिधी):गरवारे क्रिकेट संकुलनावर सुरू असलेल्या कास्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित ३० व्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण पोलिस, मसीआ ब आणि महावितरण अ संघाने बाद फेरीत प्रवेश केला. आजचा सामन्यात संजय सपकाळ, मंगेश नितुरकर आणि स्वप्नील चव्हाण सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.

पहिल्या सामन्यात ग्रामीण पोलिस संघाने जिल्हा वकील अ संघावर १३ धावांनी विजयी मिळवला. ग्रामीण पोलिस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १६३ धावा काढल्या. यामध्ये साहिल तडवीने ३४ चेंडूंत ७ चौकारांसह ४६ धावा केल्या. विकास नगरकरने १७ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २६ धावा, अष्टपैलू संजय सपकाळने १८ चेंडूत २ चौकारांसह २५ धावा तर विशाल नरवडेने १७ चेंडूत ५ चौकारांसह २४ धावांचे योगदान दिले. वकील संघातर्फे संदीप देवगावकरने १८ धावांत २ गडी, दिनकर काळेने २७ धावांत २ गडी, अनंता बडदेने ३२ धावांत २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जिल्हा वकील अ संघ निर्धारित २० षटकांत ७ बाद १५० धावाच करू शकला. यामध्ये मुकुल जाजूने ३९ चेंडूत ४ उत्तुंग षटकार व ७ चौकारांसह ६१ धावा, सचिन सुदामेने २४ चेंडूत १ षटकार व ४ चौकारांसह २९ धावा, दिनकर काळेने १२ चेंडूत २ चौकारांसह २२ धावा तर आदर्श जैनने १२ धावा काढल्या. पोलिसकडून संजय सपकाळने ३५ धावांत ३ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. इम्रान खानने २० धावांत २ गडी, किरण लहाने व गणेश गोरक्षक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

निखिल कदमचे अर्धशतक, निठूरकरची धारदार गोलंदाजी :
दुसऱ्या सामन्यात मसीआ ब संघाने वैद्यकीय प्रतिनिधी क संघावर ५२ धावांनी विजयी मिळवला. वैद्यकीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मसीआने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद १७९ धावा केल्या. यामध्ये निखिल कदमने ४७ चेंडूंत १ षटकार व ७ चौकारांसह ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. निकित चौधरीने १६ चेंडूत ४ चौकारांसह २२ धावा, गिरीष खत्रीने १२ चेंडूंत २ षटकार व २ चौकारांसह २२ धावा तर कर्णधार अजिंक्य पाथ्रीकर व मंगेश निटूरकर यांनी प्रत्येकी १४ धावांचे योगदान दिले. वैद्यकीय संघातर्फे शेख अल्ताफने ४७ धावांत ३ गडी, सय्यद हुसैनने १७ धावांत २ गडी तर अब्दुल सामी व सय्यद हम्मद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात वैद्यकीय प्रतिनिधी संघाचा डाव १७ षटकात सर्वबाद १२७ धावांवर संपुष्टात आला. यामध्ये लईक अन्सारीने २७ चेंडूंत २ षटकार व ६ चौकारांसह ४९ धावा, अब्दुल सामीने १५ चेंडूत १ षटकार व ४ चौकारासह २८ धावा, अल्ताफ शेखने १२ चेंडूत २ चौकारांसह १२ धावा तर अब्दुल गफूरने १० चेंडूत २ चौकारांसह ११ धावांचे योगदान दिले. मसीआ संघातर्फे मंगेश निटूरकरने अप्रतिम गोलंदाजी करत केवळ ३० धावांत ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. कर्णधार अजिंक्य पाथ्रीकर १८ धावांत ३ गडी, गिरीश खत्रीने १२ धावांत २ गडी, राम राठोडने २२ धावांत १ गडी बाद केला.

स्वप्निल चव्हाणचे तडाखेबंद अर्धशतक :

तिसऱ्या सामन्यात महावितरण अ संघाने महानगरपालिका अ संघावर ७ गड्यांनी मात केली. महानगरपालिकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात सर्वबाद १३२ धावा केल्या. यामध्ये योगेश पवारने ५२ चेंडूत ८ चौकारांसह ५९ धावा, बसित अली खानने २८ चेंडूत ३ चौकारांसह ३१ धावा तर सय्यद जावेदने १६ चेंडूत ४ चौकारांसह १९ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाही. महावितरणच्या सय्यद इनायत अलीने केवळ २२ धावांत ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले.  प्रदीप चव्हाणने ३९ धावांत ३ गडी, कैलास शेळकेने ३८ धावांत २ गडी तर सय्यद वहाबने १९ धावांत १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात महावितरणने १६ षटकांत ३ गडी गमावत विजयी लक्ष गाठले. यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केलेल्या स्वप्नील चव्हाणने ५७ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ८५ धावांची तुफानी खेळी केली. प्रदीप चव्हाणने २१ चेंडूत ३ चौकारासह २७ धावा तर कर्णधार सचिन पाटीलने ५ चेंडूत १ षटकार व १ चौकारांसह १० धावांचे योगदान दिले. महानगरपालिका  संघातर्फे योगेश पवार व रईस अहमद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. एक फलंदाज धावचीत झाला.
Tags: 30th Shaheed Bhagat Singh Industrial T20 Cricket Tournament
ShareTweetSend
Next Post

IPL 2022 : चेन्नई आणि कोलकाता संघांमध्ये रंगणार उद्घाटन सामना, अशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.