• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

गंधेकर संघ उपांत्य फेरीत शिवांशशी भिडणार

by pravin
March 14, 2022
in कबड्डी, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई (प्रतिनिधी): अमर हिंद मंडळातर्फे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘अ’ गट पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात गंधेकर एलेक्ट्रिकल्सने सचिवालय जिमखान्याला, आर. आर. एंटरप्राइजेसने पी. डी. हिंदुजाला, व शिवांश एंटरप्राइजेसने मुंबई पोष्टाला पराभूत करून उपांत्य फेरीतील आपापले स्थान पक्के केले.

अमर वाडी, दादर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत उपउपांत्य फेरीच्या सामन्यात गंधेकर एलेक्ट्रिकल्सने सचिवालय जिमखान्यावर ३८-२५ असा १३ गुणांनी मोठा विजय साजरा केला. या सामन्यात गंधेकरच्या दिप थरवळने चौफेर चढाई करत त्यांच्या संघाची विजयश्री निश्चित केली. त्याला उत्कृष्ट साथ देताना कल्पेश कडूने जोरदार पकड केल्या. सचिवालयाच्या कल्पेश जाधव व गणेश भोईरने जोरदार लढत दिली मात्र ते आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहचवू शकले नाहीत.
दुसऱ्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात आर. आर. एंटरप्राइजेसने पी. डी. हिंदुजाला ४३-३१ अशी १२ गुणांनी धूळ चारली. या सामन्यात आर. आर.च्या अनिकेत भेलसेकर ओमकार ढवळे यांनी अनुक्रमे पकड व चढाईत चमकदार कामगिरी नोंदवत विजय साकारला. तर पराभूत हिंदुजाच्या धनंजय सरोजने कडवी लढत दिली मात्र ते आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

शिवम, आकाशच्या पकडीच्या जोरावर शिवांशची बाजी :
तिसऱ्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात शिवांश एंटरप्राइजेसने मुंबई पोष्टावर ३९-२२ असा १७ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात शिवांशच्या शिवम पवारने चढाईत कमालीची कामगिरी पार पाडली व आकाश बर्गेने अतिशय छान पकड करत मुंबई पोष्टाला डोक वर काढण्याची संधी दिली नाही. तर पराभूत मुंबई पोष्टाच्या शुभम चौगुलेने चांगला खेळ केला.

Tags: Gandhekar-team-semi-finalkabaddi
ShareTweetSend
Next Post

जावेद पटेल जयपूरमध्ये करणार औरंगाबादचे प्रतिनिधीत्व

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.