• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

रोहित, विराटचं महिला संघाला प्रोत्साहन, रविवारी होणार सामना

by pravin
March 3, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत रविवारी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि सलामीवीर पृथ्वी शॉ यंनी महिला संघाला प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या. तसेच विश्वचषक २०२२ स्पर्धेदरम्यान भारतीय महिला संघाला पाठिंबा देण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. महिलांचा एकदिवसीय विश्वचषक ४ मार्चपासून सुरु होणार असून पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघाचा समावेश आहे. ३ एप्रिलला क्राइस्टचर्चमध्ये अंतिम विजेता ठरेल.

 

भारतीय कर्णधार रोहित शर्माने #HamaraBlueBandhan मोहिमेचा व्हिडीओ Instagram Reels वर पोस्ट केला आहे. तर, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, “महिला क्रिकेट संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी यापेक्षा चांगली संधी नाही. कारण आयसीसी विश्वचषकातील भारताचा पहिला सामना ६ मार्च २०२२ रोजी सकाळी ६.३० वाजता होत आहे. तेव्हा अलार्म सेट करा.

आयसीसी महिला विश्वचषक २०२२ आला आहे. महिला संघाला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी मी तयार आहे. विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे! तुम्ही देखील तयार आहात का?. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचं १२ वं पर्व आहे. १९८२ आणि २००० नंतर न्यूझीलंडमध्ये होणारा तिसरा वर्ल्डकप आहे. ४ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत ऑकलंड, क्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, टॉरंगा आणि सहा वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवला जाईल. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे आठ संघ आहेत. या संघांमध्ये एकून ३१ सामने होणार आहेत.

Tags: -womenCricketfirst-matchVirat Kohli
ShareTweetSend
Next Post

बावणेच्या शतकामुळे महाराष्ट्र ४ बाद २९८

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.