• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

अंतिम फेरीत पाटणा पायरेट्सवर एका गुणाने निसटता विजय;

by pravin
February 26, 2022
in कबड्डी
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

बंगळूरु –बंगळूरुच्या शेरेटॉन हॉटेलच्या क्रीडांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात बचावपटूंपेक्षा आक्रमकांचे वर्चस्व पाहायला मिळाले.प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात दबंग दिल्लीच्या रूपात ‘नवीन’ विजेते उदयास आले. विक्रमवीर चढाईपटू प्रदीप नरवालच्या अनुपस्थितीत चौथ्यांदा जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या पाटणा पायरेट्सला रोमहर्षक लढतीत दिल्लीने ३७-३६ असे नमवले.

 

बंगळूरुच्या शेरेटॉन हॉटेलच्या क्रीडांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात बचावपटूंपेक्षा आक्रमकांचे वर्चस्व पाहायला मिळाले. दिल्लीच्या विजयाचे विजय मलिक (१४ गुण) आणि नवीन कुमार (१० गुण) हे शिल्पकार ठरले. दिल्लीकडून अनुभवी बचावपटू मनजीत चिल्लर आणि संदीप कुमार यांनी प्रत्येकी दोन गुण मिळवले.

सामन्याच्या सुरुवातीला नवीन आणि सचिन तन्वर यांच्यातील चढायांतील बोनस गुणासाठीची जुगलबंदी पाहायला मिळाली. सचिन (१० गुण) आणि गुमान सिंग (९ गुण) यांनी पाटण्याला पहिल्या सत्रात १७-१५ अशी आघाडी मिळवून दिली. पण पहिला लोण १५व्या मिनिटाला दिल्लीने पाटण्यावर चढवला. दुसऱ्या सत्रात ११व्या मिनिटाला दिल्लीने पाटण्याला २५-२५ असे बरोबरीत गाठले. मग १४व्या मिनिटाला दिल्लीने दुसरा लोण चढवला आणि आघाडी घेतली. १७व्या मिनिटाला विजयने चढाईत एक बोनससह तीन गुण वसूल करीत दिल्लीला मोठी आघाडी मिळवून दिली. पण अखेरच्या मिनिटांत पाटण्याने मोनू आणि मोहम्मदरझा शाडलू यांनी चढायांच्या गुणांवर कडवी लढत दिली. विजयने यशस्वी चढायांचे सातत्य राखत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

पाटण्याचा बचावटू मोहम्मदरझाची जादू अंतिम सामन्यात पाहायला मिळाली नाही. उपांत्य सामन्यात प्रदीप नरवालच्या यूपी योद्धाला हरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहम्मदरझाला फक्त दोन गुण मिळवता आले.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : नवीन कुमार (दबंग दिल्ली)

 

सर्वोत्तम चढाईपटू : पवन शेरावत (बंगळूरु बुल्स)

 

सर्वोत्तम पकडपटू : मोहम्मदरझा (पाटणा पायरेट्स)

 

 

Tags: matchPro Kabaddiresultwinner
ShareTweetSend
Next Post

आयपीएल’मधील संघांची विभागणी; नक्की वाचा

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.