• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, July 22, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

मिताली राज आणि झुलन गोस्वामीला संघात मिळालं स्थान

by pravin
January 20, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आयसीसीने २०२१ वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट महिला वनडे संघ (ICC Women’s ODI Team of the Year 2021) घोषित केला आहे. भारतीय कर्णधार मिताली राज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांना या संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर इंग्लंडची विश्वचषक विजेती कर्णधार हीदर नाइट हिला या संघाची कर्णधार बनवण्यात आले आहे. आयसीसीच्या या संघात दक्षिण आफ्रिकेचे ३ खेळाडू आहेत. तर भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे प्रत्येकी २ खेळाडू यात आहेत. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी एका क्रिकेटपटूला या संघात स्थान मिळाले आहे.

याआधी आयसीसीने महिलांचा सर्वोत्तम टी-२० संघ जाहीर केला. यात भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने स्थान मिळवले. परंतु पुरुष संघात एकाही भारतीय क्रिकेटपटूला स्थान मिळवता आलेले नाही. टी-२० प्रकारात २०२१ या वर्षांत ३१.८७च्या सरासरीने एकूण २५५ धावा काढणारी स्मृती भारताचे उपकर्णधारपदही सांभाळते आहे.

आयसीसी महिला सर्वोत्तम वनडे संघ – लिझेल ली, एलिसा हिली, टॅमी ब्युमाँट, मिताली राज, हीदर नाइट (कर्णधार), हेली मॅथ्यूज, मारिजाने कॅप, शबनिम इस्माईल, फातिमा सना, झुलन गोस्वामी, अनिसा मोहम्मद.

आयसीसी महिला सर्वोत्तम टी-२० संघ – स्मृती मानधना, टॅमी ब्युमाँट, डॅनी वॅट, गॅबी लेविस, नॅट शिव्हर (कर्णधार), एमी जोन्स, लॉरा वोलव्हर्ट, मारिजाने कॅप, सोफी एक्लेस्टोन, लॉरिन फिरी, शबनिम इस्माईल.

Tags: CricketICCJHULAN GOSWAMITAALI RAJTEAM OF THE YEAR
ShareTweetSend
Next Post

सर्वोत्तम कसोटी संघात रोहित शर्माचा समावेश

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.