• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 23, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

बीसीसीआयच्या वार्षिक सभेत घेतले गेले मोठे निर्णय; ‘या’ राज्यांना दिला करोडोंचा निधी

by pravin
December 5, 2021
in क्रिकेट, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ९० वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत बीसीसीआयने सामनाधिकारी आणि संघाच्या सपोर्ट स्टाफविषयी मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीत भारतीय क्रिकेटशी संबंधीत इतरही अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले आणि चर्चा करण्यात आली. बीसीसीआयने सामनाधिकारी आणि सपोर्ट स्टाफच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढवली आहे.

बीसीसीआयने सामनाधिकारी आणि सपोर्ट स्टाफच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढवली आहे. बीसीसीआयचा हा निर्णय सर्व सामनाधिकारी आणि सपोर्ट स्टाफच्या सर्व सदस्यांसाठी फायदेशीर असेल यात शंका नाही. आधी वयाचे ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना आणि सपोस्ट स्टाफला निवृत्ती घ्यावी लागायची. मात्र, आता बीसीसीआयने याची मर्यादा वाढवून ६५ वर्ष केली आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती देताना सांगितले की, “सामनाधिकारी आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांची वयोमर्यादा ६० वर्षांवरून ६५ वर्ष केली गेली आहे. पण हे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल.”

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या बाबतीत माहिती दिली. अधिकारी यावेळी म्हणाले की, “आता आमच्याकडे दिशानिर्देश आहेत. आता त्यांना निवृत्तीसाठी पाच अधिक वर्ष मिळतील.” बैठकीदरम्यान पुडुचेरी, बिहार आणि उत्तराखंड राज्यांतील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आणि त्यांना आर्थिक मदत देखील करण्यात आली. अधिकारी पुढे बोलताना म्हणाला की, “प्रत्येका राज्याच्या बोर्डला १० करोड रुपये मंजूर करण्याला आले आहेत. तसेच, प्रत्येक ठिकाणी इनडोअर सुविधा विकसित करण्यावर भर दिला जाईल.”

बीसीसीआयने ब्रिजेश पटेल आणि एमकेजे मजूमदार यांना आयपीएलच्या संचालन परिषदेत नव्याने सामील केले आहे. याबाबत बीसीसीआने माहिती देताना सांगितले की, ‘भारताचा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा आधीपासूनच आयपीएलच्या संचालन समितीत भारतीय क्रिकेटच्या प्रतिनिधीच्या रूपात सहभागी आहे.’ बैठकीत या सर्व विषयांव्यतिरिक्त इतरही विषयांवर चर्चा आणि निर्णय घेण्यात आले.
Tags: करोडोंचा निधीबीसीसीआयराज्यांनावार्षिक सभे
ShareTweetSend
Next Post

एजाजच्या अभिनंदनासाठी गुरु द्रविडसह ‘टीम इंडिया’ न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.