• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

कविता नावंदे यांनी अहमदनगर नंतर औरंगाबादमध्ये केला अनेक कोटींचा घोटाळा?;घोटाळ्यात जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त हे ही सहभागी आहेत ?

by pravin
December 3, 2021
in अन्य खेळ, बातम्या, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद(प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची कारकीर्द वादग्रस्त असतांनी सुद्धा यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही उच्च न्यायालयाचा सुद्धा यांनी अवमान केला आहे. विभागीय क्रीडा संकुलात आपल्या कार्यालयाची दुरूस्ती करण्यासाठी कुणाची परवानगी न घेता काम करण्यात आले यासंबंधीचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असतानी सुद्धा यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मदत केल्याचा आरोप होत आहेत ? यांना ज्या-ज्या ठिकाणी नियुक्ती दिली त्या त्या ठिकाणी यांनी घोटाळे केले आहेत अहमदनगर येथील घोटाळ्याची विधानसभेत चर्चा झाली होती त्यावेळी तत्कालीन पुण्याचे आमदार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता याचप्रमाणे औरंगाबाद मध्येही घोटाळे सत्र सुरु.
पुन्हा एकदा अनेक कोटीं रुपयांचा  मोठा घोटाळा समोर येण्याचे चिन्ह दिसत आहे जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये व्यायाम शाळा साहित्य वितरणात गैर व्यवहार झाल्याचा आरोप पुण्याच्या एका तक्रार दाराने क्रीडा मंत्रालयाकडे केल्यानंतर त्याची तातडीने बैठक बोलावून क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले. यांनी आपल्या क्रीडा मंत्र्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये गृहीत धरून कोणतीही पुर्व सुचना  न देता नाव टाकले या स्वतः  काय समजतात यांना क्रीडा मंत्रालयातील कोणी पाठी राखा आहेत ? निलंबित का होत नाही. यांनी विद्यामान लोकप्रतिनिधी यांच्यावर विश्वास नसावा म्हणून माजी लोकप्रतिनिधी यांच्या बैठका सुट्टीच्या दिवशी घेतात

तसेच कविता नावंदेची खातेनिहाय चौकशीसाठी इतर विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश का होत नाही जेणेकरून यामध्ये पारदर्शकता  येईल .चौकशी सुरु होती न होती पुन्हा चौकशीसाठी तीन सदस्य समिती आज शुक्रवारी शहरात दाखल होत आहे दुसरीकडे शहरातील मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आपल्या निधीतून खर्च झालेल्या एक कोटी रुपयांचे क्रीडा साहित्य खरेदीबाबतचा हिशोब क्रीडा अधिकारी नावंदे यांच्याकडून मागवल्याचे लेखी पत्र पाठवले असताना साहित्य खरेदीबाबतचा हिशोब सादर केला नाही असे स्पोर्ट्स पॅनोरामा बोलताना सागितले या वेळी असे हि म्हणाले कि या मध्ये जे दोषी सापडतील त्यांच्यावर राज्य सरकारच्या वतीने नक्कीच  कारवाही करण्यात येईल.

तक्रारीवर क्रीडा व युवक संचालयाने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी चौकशी समिती नियुक्त केली हि समिती ३-६ डिसेंबर या कालावधीमध्ये प्राथमिक चौकशी करणार आहे. जिल्हानियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध संस्था ग्रामपंचायती, व्यायामशाळा साहित्याचे वितरण करण्यात आले यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याची तक्रार पुणे येथील श्याम राजाराम भोसले यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्यासह क्रीडा आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. क्रीडा व युवक संचालयाने उपसंचालक अनिल चोरमले यांनी चौकशीचे आदेश दिले आहे यामध्ये स्वतः अनिल चोरमले, उर्मिला मोराळे उपसंचालक औरंगाबाद विभाग आणि सुहास पाटील उपसंचालक पुणे चौकशीसाठी औरंगाबाद मध्ये दाखल होणार आहे यापूर्वी यांनी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते .

आजच्या चौकशीमध्ये काय झाले पाहा

खात्रीलायक सूत्रांनुसार  तीन  गट करून क्रीडा अधिकारी यांना शहरा जवळ देण्यात आलेल्या व्यायाम शाळा आणि  साहित्याची  पाहणी करण्यात आली. किती साहित्य आहे? कधी बसवले? स्थानिक नागरीका मार्फत विचारणा करण्यात आली फोटो काढण्यात आले.सर्व कागद पत्रे  चौकशी अधिकाऱ्यांनी मागवले  त्या मध्ये चतुर सीमा मोजणी करण्यात आली आहे का ? ती योग्य आहे हे पाहण्यात आले .सूत्रांनुसार  हे सर्व कागदपत्रे  खोली नंबर ५ मध्ये तयार करण्यात आले आहे . यापुढील तपास उद्या  वरील तीन गट तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करणार आहेत .

 

कोण घालत आहे पाठीशी 

१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर तात्काळ वर्तणूक प्रमाणपत्र द्यावे लागते यांनी आजपर्यंत ? दिले नाही.
२) अनुभव प्रमाणपत्र ही बनावट आहेत ?
३) स्वयंसिद्धी असोसिएशन महाराष्ट्र पुणे या संस्थेच्या नावाने सातारा येथे विविध विकास कामे नावंदे यांनी कसे घेतले.
४) १०२०/प्र.क्र.५३/क्रीयुसे-२ दि. ९ मार्च २०२१ अन्वये विभागीय चौकशी सुरू आहेत परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई किंवा निलंबन ? झाले नाहीत.
५) अहमदनगर येथे कोटी रुपयांचे घोटाळे केल्यानंतर एक FIR दाखल झाल्यानंतर यांची बदली हिंगोली येथे झाली.
६) क्र. आस्थापना/जिक्रीअ/बदली/२०२०/का-१ दि.सप्टेंबर २०२० अन्वये राजकीय वजन वापरून औरंगाबाद .
७) विभागीय क्रीडा संकुल येथील उच्च न्यायालयात एक सुमोटो याचिका दाखल असताना ही यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयची दुरुस्ती कुणाच्या आदेशांनी केली ?

या प्रश्ना मुळे संशयाची  सुई  माजी मंत्री विनोद तावडे ,औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रे,आणि जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याभोवती फिरत आहे.  हे सर्वजण अजून कित्येक दिवस भ्रष्टचारी अधिकारी पाठीशी घालणार आहे.हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहेत

 

Tags: औरंगाबादमध्ये केला अनेक कोटींचा घोटाळाकविता नावंदेजिल्हाधिकारीविभागीय आयुक्त
ShareTweetSend
Next Post

शतकवीर मयंकचे सहकाऱ्याने केले कौतुक; म्हणाला, “ही महान कामगिरी…”

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.