• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, July 22, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

नियमित कर्णधार म्हणून पहिल्याच टी२० मालिकेत रोहित बनला ‘मॅन ऑफ द सिरीज’

by pravin
November 21, 2021
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

भारतीय संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७३ धावांनी पराभव केला आहे. या सामना विजयासह भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० ने जिंकली आहे. याआधी भारतीय संघाने मालिकेतील दोन्ही सामने जिंकले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या होत्या. रोहितने ५६ धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

भारतीय संघाचा नवखा कर्णधार रोहित शर्मा या टी२० मालिकेत मालिकावीर ठरला आहे. यासह रोहितने एका विक्रमात टी२० संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची बरोबरी केली आहे.रोहित शर्माने या मालिकेत सलग दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. पहिल्या सामन्यात देखील त्याने ४८ धावांची खेळी खेळली होती. म्हणून त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. टी-२० संघाचा कर्णधार म्हणून मालिकावीर पुरस्काराने सन्मानित होताच त्याने विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. दोघांनी भारतीय टी-२० संघाचे कर्णधार असताना मालिकावीर पुरस्कार पटकावला होता.

दरम्यान भारतीय संघाने या सामन्यात २० षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या. भारताकडून रोहित शर्माने ३१ चेंडूत ५६ धावा आणि इशान किशनने २१ चेंडूत २९ धावा केल्या. श्रेयस अय्यरने २५ आणि व्यंकटेश अय्यरने २० धावा केल्या. हर्षल पटेलनेही ११ चेंडूत १८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने २७ धावांत ३ बळी घेतले होते. ईश सोढी, ऍडम मिलने, लोकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट यांना १-१ यश मिळाले होते.

प्रत्युत्तरात न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने अर्धशतक झळकावत संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्याने ३६ चेंडूत ५१ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र संघातील अन्य कोणताही खेळाडू खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. न्यूझीलंड संघातील ८ खेळाडू दहाच्या आकड्याला स्पर्श करू शकले नाहीत. संपूर्ण संघ १७.२ षटकांत १११ धावांत गारद झाला. या डावात अक्षर पटेलने ३ तर हर्षल पटेलने २ बळी घेतले. न्यूझीलंडवर भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडवर भारताचा सर्वात मोठा विजय ५३ धावांचा होता.

Tags: ‘मॅन ऑफ द सिरीज’कर्णधारपहिल्याच टी२० मालिकेतरोहित शर्मा
ShareTweetSend
Next Post

यूगांडा पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल 2021;निलेश गायकवाड ला रौप्य पदक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.