• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

निकेत दलालला चॅम्पियन चेन्नईतील राष्ट्रीय ट्रॉयथॉलन स्पर्धेत सुवर्णपदक; स्प्रिंट इव्हेंटमध्ये मारली बाजी

by pravin
September 27, 2021
in अन्य खेळ, बातम्या, राष्ट्रीयस्तरीय, स्पर्धा
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी)- भारतीय ट्रायथाॅलन महासंघांच्या वतीने चेन्नई येथे या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत औरंगाबादचा दिव्यांग आर्यनमॅन निकेत दलालने सहभाग घेतला. त्याने सुपर स्प्रिंटच्या तिन्ही इव्हेंटमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. त्याने स्वींमिंगमध्ये ९ मिनिटांत निश्चित २५० मीटरचे अंतर गाठून अव्वल स्थानी धडक मारली. ओपन वाॅटरमध्ये हा इव्हेंट आयोजित करण्यात आला हाेता. त्यानंतर त्याने सायकलिंग करताना ७ किलाेमीटरचे अंतर १४ मिनिट १६ सेकंदांत पूर्ण केले. त्यापाठाेपाठ रनिंगचे १.३ किमीचे अंतर ७ मिनिटे ५५ सेकंदांत गाठले. यासह त्याने साेनेरी यशाचा पल्ला गाठला.

पहिला दिव्यांग आर्यनमॅन निकेत दलाल रविवारी राष्ट्रीय ट्रायथाॅलन स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने दिव्यांगासाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने स्प्रिंटच्या तिन्ही इव्हेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. अंध निकेतने आपल्या गटातील 18 स्पर्धकांमधून अव्वल स्थान गाठले.

निकेत दलालने नॅशनल चॅम्पियन हाेण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. याच मेहनतीतून त्याला साेेनेरी यशाचा पल्ला गाठता आला. आगामी काळातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्याला आपला ठसा उमटवण्याची माेठी संधी आहे. प्रचंड क्षमता आणि इच्छाशक्तीच्या बळावर त्याने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.

अशी राहिली कामगिरी – सुपर स्प्रिंट इव्हेंट २५० मीटर स्विमिंग (ओपन वाॅटर) – ९ मिनिट सायकलिंग (७ किलाेमीटर , दाेन लॅप) – १४ मिनिटे १६ सेंकदरनिंग (१.३ किलाेमीटर)-७ मिनिटे ५५ सेकंद

ShareTweetSend
Next Post

मुंबई इंडियन्स पंजाब किंग्सच्या विरूद्ध मोहिमेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार करीत आहे

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.