अमरावती | प्रतिनिधी
एमेच्योर नेटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने आणि अमरावती जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनच्या वतीने २५ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ (पुरुष व महिला) नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यभरातील २६ पुरुष आणि १८ महिला संघांनी सहभाग नोंदविला.
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत रंगली. अखेरपर्यंत उत्कंठा कायम ठेवणाऱ्या या सामन्यात परभणीने १३-११ अशा दोन गुणांच्या फरकाने विजय मिळवत विजेतेपद पटकावले, तर छत्रपती संभाजीनगर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
छत्रपती संभाजीनगर संघात जयवर्धन इंगळे, अजय राजपूत, अबुतालीब अन्सारी, सन्नी देहाडे, राजवर्धन इंगळे, रितेश दाभाडे, कैफ गुलाम हुसेन, रोहित साळवे, अजय रगडे, विशाल जाधव, तन्मय मगरे आणि ऋषिकेश शेजूळ यांचा समावेश होता. संपूर्ण स्पर्धेत संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली.
संघाला प्रशिक्षक आकाश सरदार आणि हर्षवर्धन मगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजकुमार मुंब्रे, सतीश इंगळे, धर्मेंद्र काळे, रमेश प्रधान, नितेश साबळे, भक्ती देशमुख, मनोज बनकर, दिलीप जाधव, सचिन दांडगे, संकेत बोंगारगे, अनिल मोटे, शुभम गायकवाड, कुणाल नरवडे, कीर्तीवर्धन मगरे, आकाश बोर्डे, मेघा पठारे, प्राची बागुल, पूजा सोनवणे, भक्ती बिडवे, भाग्यश्री प्रधान, आकांक्षा मगरे, दिपाली प्रधान, नंदिनी बनकर, दिपाली काळे, वैष्णवी खरात, साक्षी जाधव, रिद्धी सोनवणे, मानसी वायकोस, तनिषा बनकर, निलेश भगत, रोहन काळे, अमोल बारबैले, प्रमोद गवई, आदित्य झोंड, प्रसाद तुपे, यशवर्धन इंगळे, अंश रगडे, लतेश मगरे, सागर सोनावणे आदींनी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
छत्रपती संभाजीनगर संघाच्या या यशामुळे जिल्ह्याच्या नेटबॉल क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे.




