• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 3, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

‘खाशाबा’ ट्रेलर वादात; कॉपीराईट प्रकरणी 4 जुलैला न्यायालयीन आयोगावर सुनावणी

by pravin
July 2, 2026
in कुस्ती, बातम्या
Reading Time: 1 min read
'खाशाबा' ट्रेलर वादात; कॉपीराईट प्रकरणी 4 जुलैला न्यायालयीन आयोगावर सुनावणी
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

स्पोर्ट्स पॅनोरमा | मुंबई

ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित ‘खाशाबा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच तो नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लेखक संजय दुधाणे यांनी ट्रेलरमधील काही दृश्ये त्यांच्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या पुस्तकावर आधारित असल्याचा दावा केला असून, या प्रकरणी न्यायालयीन आयोगाच्या नियुक्तीच्या अर्जावर 4 जुलै रोजी पुणे दिवाणी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दुधाणे यांनी यापूर्वी चित्रपटाच्या कथेबाबत कॉपीराईट दावा दाखल केला होता. दावा प्रलंबित असतानाही 1 मे रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्याने पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे, ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रॉडक्शन यांना नोटीस बजावली होती.

न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान चित्रपट जुलैपर्यंत प्रदर्शित होणार नसल्याचे दिग्दर्शकांच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर दुधाणे यांच्यावतीने अॅड. सुवर्णा शिंदे यांनी न्यायालयीन आयोग नेमण्याची मागणी केली. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आयोगाने चित्रपट पाहून तसेच संबंधित पुस्तकाचा अभ्यास करून अहवाल सादर करावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. न्यायालयाने हा अर्ज ग्राह्य धरत त्यावरील सुनावणी 4 जुलै रोजी निश्चित केली आहे.

19 पुरावे न्यायालयात सादर

लेखक संजय दुधाणे यांनी न्यायालयात एकूण 19 पुरावे सादऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित ‘खाशाबा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच तो नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लेखक संजय दुधाणे यांनी ट्रेलरमधील काही दृश्ये त्यांच्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या पुस्तकावर आधारित असल्याचा दावा केला असून, या प्रकरणी न्यायालयीन आयोगाच्या नियुक्तीच्या अर्जावर 4 जुलै रोजी पुणे दिवाणी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दुधाणे यांनी यापूर्वी चित्रपटाच्या कथेबाबत कॉपीराईट दावा दाखल केला होता. दावा प्रलंबित असतानाही 1 मे रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्याने पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे, ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रॉडक्शन यांना नोटीस बजावली होती.

न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान चित्रपट जुलैपर्यंत प्रदर्शिर केल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये ट्रेलरमधील 5 दृश्ये, नागराज मंजुळे यांनी दाखल केलेल्या 5 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीच्या दाव्यातील 4 संदर्भ, तसेच रणजीत जाधव यांच्याशी झालेल्या कराराशी संबंधित 6 कागदपत्रांचा समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दुधाणे यांच्या म्हणण्यानुसार, नागराज मंजुळे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातही त्यांच्या पुस्तकाचा संदर्भ आढळतो. तसेच चित्रपटासाठी वापरण्यात आलेल्या काही संदर्भांचा संबंध त्यांच्या पुस्तकाशी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ट्रेलरमधील दृश्यांवर आक्षेप

लेखकांच्या मते, ट्रेलरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री, खाशाबा जाधव यांचे महाविद्यालयीन जीवन, इंग्रज अधिकारी, बडोद्याचे माणिकराव, पंजाबी मल्लांवरील अन्याय, तसेच कुस्ती, मल्लखांब आणि खो-खोशी संबंधित दाखविण्यात आलेली दृश्ये त्यांच्या पुस्तकातील कथनाशी साधर्म्य दर्शवितात.

ट्रेलरमधील काही प्रसंग पुस्तकातील पहिल्या प्रकरणातील घटनांशी मिळते-जुळते असल्याचा दावा करत, हा केवळ योगायोग नसून पुस्तकावर आधारित चित्रपट असल्याचे लेखक संजय दुधाणे यांनी म्हटले आहे.

Tags: Sports Panoramaआटपाट प्रॉडक्शनऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवकॉपीराईट वादखाशाबाखाशाबा चित्रपटखाशाबा ट्रेलरजिओ स्टुडिओनागराज मंजुळेपुणे न्यायालयमराठी चित्रपटमहाराष्ट्रसंजय दुधाणे
ShareTweetSend
Next Post
FIBA आशिया कप 2025 भारताची दमदार सुरुवात; पहिल्या क्वार्टरअखेर कतारवर 12-7 अशी आघाडी

FIBA आशिया कप 2025 : भारताची दमदार सुरुवात; पहिल्या क्वार्टरअखेर कतारवर 12-7 अशी आघाडी

ताज्या बातम्या

FIBA आशिया कप 2025 : कतारचे पुनरागमन, तरीही भारताची 44-42 अशी निसटती आघाडी कायम

FIBA आशिया कप 2025 : कतारचे पुनरागमन, तरीही भारताची 44-42 अशी निसटती आघाडी कायम

FIBA आशिया कप 2025 : प्रणव प्रिन्स-हर्ष डागरची चमक; भारताची हाफटाइमला कतारवर 30-22 आघाडी

FIBA आशिया कप 2025 : प्रणव प्रिन्स-हर्ष डागरची चमक; भारताची हाफटाइमला कतारवर 30-22 आघाडी

FIBA आशिया कप 2025 भारताची दमदार सुरुवात; पहिल्या क्वार्टरअखेर कतारवर 12-7 अशी आघाडी

FIBA आशिया कप 2025 : भारताची दमदार सुरुवात; पहिल्या क्वार्टरअखेर कतारवर 12-7 अशी आघाडी

'खाशाबा' ट्रेलर वादात; कॉपीराईट प्रकरणी 4 जुलैला न्यायालयीन आयोगावर सुनावणी

‘खाशाबा’ ट्रेलर वादात; कॉपीराईट प्रकरणी 4 जुलैला न्यायालयीन आयोगावर सुनावणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.