स्पोर्ट्स पॅनोरमा |
भारतीय क्रिकेटपटू शशांक सिंग याने स्वतःविरुद्ध आणि त्याच्या वडिलांविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआर प्रकरणावर प्रथमच सार्वजनिक प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्यावर करण्यात आलेले मारहाण, डांबून ठेवणे आणि गैरवर्तनाचे सर्व आरोप त्याने स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.
शशांकने सांगितले की, तक्रारदार हा त्यांच्या घरातील स्वयंपाकी नसून तो घरातील व्हिडिओ आणि छायाचित्रे काढत होता. त्यामुळे त्याच्यावर चोरीचा संशय निर्माण झाला होता.
त्याने पुढे स्पष्ट केले की, “मी किंवा माझ्या वडिलांनी कोणत्याही प्रकारची शारीरिक हिंसा केलेली नाही. आमच्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आहेत.” असेही शशांकने म्हटले आहे.
या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे करण्यात येत असून, पोलीस सध्या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे.
या प्रकरणामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





