• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज: जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केली स्वतःच्या विद्यार्थिनीला मारहाण

by pravin
September 23, 2021
in अन्य खेळ, बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी) रत्नागिरी आंबा खरेदीच्या व्यवहारातून विक्रेत्या महिलेने पैसे मागितल्याने वर्ग एकच्या महिला जिल्हा क्रीडा अधिकारी (औरंगाबाद) यांनी संबंधित विक्रेत्या महिलेस मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार बुधवारी (ता.२२) सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी आंबा विक्रेत्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्याविरोधात एनसी दाखल करण्यात आली आहे.

यासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील ३९ वर्षीय फिर्यादी महिलेने जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार क्रीडा अधिकारी कविता नावंदे (रा. योगायोग विश्वकर्मानगर, पाषाण सुस रस्ता, पुणे, सध्या. रा. औरंगाबाद) या २७ वर्षीय फिर्यादी महिलेच्या ओळखीच्या आहेत. नावंदे आणि फिर्यादी महिला यांच्यात मार्च २०२० मध्ये आंबा खरेदीविक्रीचा व्यवहार झाला होता. व्यवहाराचे पैसे नावंदे यांच्याकडून आंबा विक्रेत्या महिलेस देणे बाकी होते, त्यामुळे सदर महिला नावंदे यांना वारंवार फोन करत होती. मात्र संपर्क होत नसल्याने फिर्यादी महिलेने औरंगाबादेतील विभागीय क्रीडा संकूलाचे कार्यालय गाठत नावंदे यांना व्यवहारातील पैशांची मागणी केली. दरम्यान नावंदे यांनी ‘माझा तुझा काही संबंध नाही, मी तुला ओळखत नाही’ असे म्हणून सदर महिलेस मारहाण करुन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरुन जवाहनरनगर पोलिस ठाण्यात नावंदे यांच्याविरोधात कलम ३२३, ५०४, ५०६ नुसार एनसी दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत.

स्पोर्ट्स  पॅनोरमा सोबत बोलताना २७ वर्षीय फिर्यादी महिलेने सांगितले की  मी त्यांची विद्यार्थिनी असून त्यांनी मला रत्नागिरी येथे स्वसंरक्षणचे धडे दिले आहे.2 लाख 58 हजारचे आंबे विक्री करण्याकरता मागच्या मार्च २०२० मध्ये आणले होते फक्त मी त्याला विचारणा करता गेले की तुम्ही माझा फोन उचलत नाही ब्लॉक केला व्हाट्सअप वर काही रिप्लाय देत नाही.याविषयी विचारणा करण्यास गेले असता मला मोबाईल हिसकौन घेउन मारहाण केली. एक अधिकारी असुन या मॅडम असे वागतात.

https://www.sportspanorama.in/wp-content/uploads/2021/09/DSO-कविता-नावंदे.mp4

कारकीर्दही वादग्रस्तच

विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या नावंदे यांची ऑगष्ट २०२० मध्ये नगरहून बदली हिंगोलीला झाली होती. त्यांच्या बदलीसाठी नगरमधील बहुतांशी क्रीडा संघटनांनी देव पाण्यात ठेवले होते. त्यांच्या बदलीसाठी संघटनांनी असहकार आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले होते. नावंदे यांची राज्य पातळीवरून तीन वेळा समितीमार्फत चौकशीही करण्यात आली होती. पून्हा आपला प्रताप दाखवून दिल्याने क्रीडा विश्वात कुजबुज सुरु आहे.

ShareTweetSend
Next Post

कोलकाता ची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, रोहित शर्माची वापसी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.