• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची निलंबित करून चौकशी करण्यात यावी!

by pravin
October 30, 2021
in अन्य खेळ, बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रविण वाघ): आर्थिक गैर व्यवहाराचा आणि शासनाची दिशाभूल ठपका असलेल्या औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांच्या मार्फत ६ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रादेशिक विभागीय  चौकशी अधिकाऱ्यांच्या कडून करण्यात येणार असून यासाठी सदरकरता अधिकारी  म्हणून उपसंचालक लातूर सुधीर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांची करण्यात येणारी चौकशी  हि सातारा येथील २०१२ मधील प्रकरणापासून आणि अहमदनगर येथील २०१८-१९  तत्कालीन  जिल्हा क्रीडा अधिकारी असताना  नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळेस  खात्या अंतर्गत चौकशी करण्यात आली होती . यामध्ये औरंगाबाद उपसंचालक उर्मिला मोराळे , माजी अमरावती उपसंचालक प्रतिभा देशमुख ,पुणे उपसंचालक प्रमोधिनी अमृतवाड यांच्यामार्फत २०१९ साली प्राथमिक चौकशी मधे नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्यामुळे नावंदेची दुसऱ्यांदा खातेनिहाय चौकशी करण्यात आलेली आहे

सादरकरता लातूरचे उपसंचालक सुधीर मोरे यांनी स्पोर्ट्स पॅनोरोमाला बोलताना सांगितले कि “मी रीतसर क्रीडा विभागाला पत्र लिहून नावंदेची चौकशी पुणे येथील मुख्य कार्यालयामध्ये करण्यात यावी व  लातूर,पुणे ,औरंगाबाद  अंतर जास्त असल्यामुळे व अधिक वेळ जात असल्यामुळे आपण पुणे विभागातच चौकशी करण्यात यावी “असे तीन दिवसांपूर्वी कळवण्यात आले होते .

नावंदे यांची चौकशी करण्यात येत असताना हि चौकशी निपक्षपाती करण्या करिता निलंबित करून चौकशी करण्यात यावी असे  सातारा ,अहमदनगर  येथील सर्व  क्रीडा संघटनामार्फत मागणी करण्यात येत आहे .

कविता नावंदे यांच्याविरुद्ध  पत्रकार दिगंबर वाघ यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशी करण्याबाबत विनंती केली होती या पत्रामध्ये क्रीडा मार्गदर्शक असताना शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतल्याबद्दल तसेच सातारा जिल्हा येथील स्वयंसिद्धाचे टेंडर स्वतः टाकून शासनाची दिशाभूल केली . सातारा प्रकरणामध्ये मी कायम स्वरूपी कर्मचारी नसून प्रतिज्ञापत्र दिले असून जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमाणपत्र लावले आहे  ते चुकीचे असून त्यात सहा वर्षाचा अनुभव असताना ते या जिल्हा क्रीडा अधिकारी पदास पात्र होवू शकत नाही.तरी आज शासनाची दिशाभूल करून शासन सेवेत नोकरी जबाबदार पदावर कार्यरत आहे.एमपीएससी(MPSC) जिल्हा क्रीडा अधिकारी या पदासाठी सहा वर्षाचा अनुभव लागतो तो कालावधी नसताना खोटे सर्टिफिकेट लावून नोकरीस लागलेल्या आहे. क्रीडा खात्याचे ओ.एस.डी स्वतःकडे असताना औरंगाबाद जिल्ह्यात बदली करून घेतली.अशा विविध प्रकरणाचे पुराव्यानुसार पत्र देण्यात आले आहे.

तसेच औरंगाबाद येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाची न्यायालयीन सुमोटो  केस चालू असताना कविता नावंदेनी विभागीय क्रीडा संकुल येथील रात्रीमध्ये रूमच्या भिंती तोडून  केबिन प्रशस्त स्वरुपात करून  घेण्यात आली. नेहमी प्रमाणे यावेळेस  देखील आपल्या सुखसोयींकडे लक्ष केंद्रित केले. यावेळी विभागीय आयुक्त  सुनील केंद्रेकर यांनी कोणत्या कारणास्तव परवानगी दिली आहे असे औरंगाबाद  क्रीडा जगतात कुजबुज सुरु आहे  सुनील केंद्रेकर हे  कविता नावंदे यांना काबर आश्रय देत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे .

जिल्हा  सातारा,अहमदनगर येथे आर्थिक गैरव्यवहार आणि शासनाची दिशाभूलचा  ठपका ठेवण्यात आलेले  विभाग पुणे असताना  नावंदेची चौकशी औरंगाबाद विभागात का घेण्यात येत  आहे? असा संशयास्पद  प्रश्न क्रीडा प्रेमी मनात  निर्माण होत आहे.

 

Tags: करूनचौकशी करण्यात यावीजिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेपत्रकार दिगंबर वाघमुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांची निलंबितविभागीय आयुक्त  सुनील केंद्रेकर
ShareTweetSend
Next Post

'यूएपीए'अंतर्गत विराट कोहलीला अटक करणार का?

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.