• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, August 3, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप 2026: तगायते, फिलिपाईन्ससाठी भारतीय संघ रवाना; महाराष्ट्राच्या 25 खेळाडूंचा संघात समावेश

by pravin
August 3, 2026
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, खेळ ( वैयक्तिक), जिम्नॅस्टिक, स्पर्धा
Reading Time: 1 min read
एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप 2026: तगायते, फिलिपाईन्ससाठी भारतीय संघ रवाना; महाराष्ट्राच्या 25 खेळाडूंचा संघात समावेश
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

स्पोर्ट्स पॅनोरमा | छत्रपती संभाजीनगर

तगायते (फिलिपाईन्स) येथे 4 ते 7 ऑगस्ट 2026 दरम्यान होणाऱ्या एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला असून संघ फिलिपाईन्सकडे रवाना झाला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनल डी जिम्नॅस्टिक्स (FIG) आणि जिम्नॅस्टिक्स असोसिएशन ऑफ द फिलिपाईन्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

यंदाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघात महाराष्ट्रातील तब्बल 25 खेळाडूंना संधी मिळाली असून, ही राज्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. भारतीय संघाची निवड 7 जून 2026 रोजी मणिपूर येथे झालेल्या राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स निवड चाचणीच्या आधारे करण्यात आली होती.

स्पर्धेच्या तयारीसाठी 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात खेळाडूंनी कसून सराव करत आशियाई स्पर्धेसाठी अंतिम तयारी पूर्ण केली.

वरिष्ठ गटातील भारतीय खेळाडू

स्मित शहा, मानसी देशमुख, श्रीपाद हराळ, आर्य शहा, रामदेव बिराजदार, उदय मधेकर, अद्वैत वझे, संदेश चिंतलवाड, अभय उंटवाल, विश्वेश जोशी, पार्थेश मार्गपवार, सायली वझरकर, राधा सोनी, कार्तिकी हेगडे, श्रेया लोंढे, संकेत चिंतलवाड, तनिष रोजेगावकर, गौरी खलाणे, विश्वेश पाठक, अनिकेत चौधरी, गौरी ब्राह्मणे आणि मुग्धा बावस्कर यांचा संघात समावेश आहे.

कनिष्ठ गटातील खेळाडू

कनिष्ठ गटात ओम सोनी, जान्हवी रोंघे आणि रिधीमा आव्हाड यांची भारतीय संघात निवड झाली आहे.

प्रशिक्षक आणि अधिकारी

भारतीय संघासोबत रोहित रोंघे, राहुल श्रीरामवार आणि हर्षल मोगरे हे प्रशिक्षक म्हणून कार्यभार सांभाळणार असून इंद्रजीतसिंग राठोड यांची संघप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या स्पर्धेत डॉ. मकरंद जोशी हे तांत्रिक समिती सदस्य म्हणून काम पाहणार असून सिद्धार्थ कदम यांची आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निवड झाली आहे.

भारतीय संघाला जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधीर मित्तल, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव डॉ. मकरंद जोशी, भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभागाच्या उपसंचालक डॉ. मोनिका घुगे, क्रीडा व युवक सेवा संचालनालय छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, ॲड. संकर्षण जोशी, डॉ. आदित्य जोशी, डॉ. रणजीत पवार, हर्षल मोगरे, रोहन श्रीरामवार, डॉ. विशाल देशपांडे, डॉ. सागर कुलकर्णी, महेश सोनी, अमेय जोशी, संदीप गायकवाड, राहुल तांदळे, शत्रुंजय कोटे, तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे आणि सौ. तनुजा गाढवे यांनी स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

भारतीय खेळाडू आशियाई स्तरावर दमदार कामगिरी करत देशासाठी पदकांची कमाई करतील, असा विश्वास क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

Tags: Aerobic GymnasticsAerobics Gymnastics Asian Championship 2026Chhatrapati SambhajinagarFIGGymnastics Federation of IndiaGymnastics IndiaIndia Aerobics TeamIndian Gymnastics TeamMaharashtra GymnasticsMarathwada Sanskritik MandalPhilippines 2026Sports Panorama
ShareTweetSend

ताज्या बातम्या

एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप 2026: तगायते, फिलिपाईन्ससाठी भारतीय संघ रवाना; महाराष्ट्राच्या 25 खेळाडूंचा संघात समावेश

एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप 2026: तगायते, फिलिपाईन्ससाठी भारतीय संघ रवाना; महाराष्ट्राच्या 25 खेळाडूंचा संघात समावेश

CWG 2026 बॉक्सिंग मध्ये लोव्हलिना आणि नरेंद्रला रौप्य

CWG 2026 बॉक्सिंग मध्ये लोव्हलिना आणि नरेंद्रला रौप्य

CWG 2026: भारतीय बॉक्सर्सचा सुवर्णसप्तक!

CWG 2026: भारतीय बॉक्सर्सचा सुवर्णसप्तक!

CWG 2026: सचिन सिवाचचा सुवर्ण ठोसा! भारताला बॉक्सिंगमधील आजचे सहावे सुवर्ण

CWG 2026: सचिन सिवाचचा सुवर्ण ठोसा! भारताला बॉक्सिंगमधील आजचे सहावे सुवर्ण

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.