• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 16, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

खेळो इंडिया सेंटर, अमरावतीची कुमकुम मोहोड विश्वविजेती; आर्चरी वर्ल्ड कपमध्ये भारताला सुवर्णपदक

by pravin
June 15, 2026
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, खेळ ( वैयक्तिक), धनुर्विद्या
Reading Time: 1 min read
खेळो इंडिया सेंटर, अमरावतीची कुमकुम मोहोड विश्वविजेती; आर्चरी वर्ल्ड कपमध्ये भारताला सुवर्णपदक
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

अमरावती | प्रतिनिधी: खेळो इंडिया सेंटर, अमरावतीची उदयोन्मुख तिरंदाज कुमकुम अनिल मोहोड हिने भारतीय संघातील सहकारी धीरज बोम्मदेवरा यांच्या साथीने तुर्कीतील अँटाल्या येथे आयोजित करण्यात आलेल्या तिरंदाजी विश्वचषक फेरी (Archery World Cup Stage) 3 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकाराच्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीने बलाढ्य दक्षिण कोरिया संघाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.

अंतिम फेरीत कुमकुम आणि धीरज यांनी अचूक लक्ष्यभेद, उत्कृष्ट समन्वय आणि शांतचित्त खेळीचे दर्शन घडवत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. सामन्याच्या निर्णायक क्षणी भारतीय जोडीने दबावाखालीही उत्कृष्ट कामगिरी करत भारताच्या नावावर सुवर्णपदकाची नोंद केली.

खेळो इंडिया सेंटर, अमरावतीसाठी हे यश अत्यंत अभिमानास्पद मानले जात आहे. कुमकुम मोहोडच्या या कामगिरीमुळे केंद्रातील इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार असून भारतीय तिरंदाजी क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर झळकले आहे.

कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल क्रीडा उपसंचालक छत्रपती संभाजीनगर तथा प्रभारी अमरावती शेखर पाटील, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, सहकारी खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या सुवर्ण कामगिरीमुळे संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला असून भारताचा तिरंगा अँटाल्याच्या मैदानावर सर्वोच्च स्थानी फडकला.

Tags: #KumkumMohod #DhirajBommadevara #ArcheryWorldCup #Antalya2026 #KheloIndia #IndianArchery #GoldMedal #SportsNews #Amravati #MaharashtraSports #TeamIndia #RecurveMixedTeam
ShareTweetSend
Next Post
FIFA World Cup; ब्राझील की जर्मनी? विश्वचषकातील सर्वाधिक गोलांचा विक्रम कोणाच्या नावावर?

FIFA World Cup; ब्राझील की जर्मनी? विश्वचषकातील सर्वाधिक गोलांचा विक्रम कोणाच्या नावावर?

ताज्या बातम्या

दाम्बुल्लामध्ये रंगला वाद! वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंका ‘अ’ खेळाडूमध्ये शाब्दिक चकमक

दाम्बुल्लामध्ये रंगला वाद! वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंका ‘अ’ खेळाडूमध्ये शाब्दिक चकमक

FIFA World Cup; ब्राझील की जर्मनी? विश्वचषकातील सर्वाधिक गोलांचा विक्रम कोणाच्या नावावर?

FIFA World Cup; ब्राझील की जर्मनी? विश्वचषकातील सर्वाधिक गोलांचा विक्रम कोणाच्या नावावर?

खेळो इंडिया सेंटर, अमरावतीची कुमकुम मोहोड विश्वविजेती; आर्चरी वर्ल्ड कपमध्ये भारताला सुवर्णपदक

खेळो इंडिया सेंटर, अमरावतीची कुमकुम मोहोड विश्वविजेती; आर्चरी वर्ल्ड कपमध्ये भारताला सुवर्णपदक

श्रेयस अय्यरचे नवे ‘लक्झरी लाइफ’!

श्रेयस अय्यरचे नवे ‘लक्झरी लाइफ’!

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.